भारतातील विविध राज्यातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील एफपीओं साठी देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, (ता. देवळा, जि. नाशिक) तर्फे बायर-सेलर मिट व भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
ह्या उपक्रमाद्वारे FPO ना प्रायवेट कंपनी, एक्सपोर्टर्स, स्टार्टअप्स, फूड प्रोसेसर्स, मिल्स व इतर खरेदीदारांशी जोडणे हा मुख्य उद्देश आहे. तरी जास्तीत जास्त FPO नी सहभाग नोंदवावा ही विनंती. ह्या उपक्रमाद्वारे FPO ना नक्कीच नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील ही आम्हाला खात्री आहे. फॉर्मद्वारे आपल्या FPO ची माहिती सबमीट करावी.
देवळा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लि. ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी आहे. देवळा ॲग्रो ची स्थापना २०१४ साली करण्यात आली.
शेतकरी बांधवांना उत्कृष्ट बियाणे पुरविणे, शेतमाल खरेदी करणे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्केटिंगसाठी एक व्यासपीठ देणे हा देवळा ॲग्रो चा मुख्य उद्देश आहे.